आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंडिया अ संघाने श्रीलंका अ संघासमोर ३१८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आज इंडिया अ आणि श्रीलंका अ या दोन संघांमध्ये ही उपांत्य फेरी खेळवली जात आहे. भारताचे नेतृत्व तिलक वर्माकडे असून, त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
अभिषेक-तिलकची भागीदारी
भारताकडून अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांनी डावाची शानदार सुरुवात केली. मागील सामन्यात द्विशतक करणारा वैभव सूर्यवंशी ४० धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार तिलक वर्मा आणि अभिषेक शर्माने भारताचा डाव सांभाळला. अभिषेक शर्माने ७८ धावांची अत्यंत महत्त्वाची खेळी केली, तर तिलक वर्माने अर्धशतकी खेळी करत डावाला आकार दिला. कुमार कुशाग्र २१ धावा करून बाद झाला. रिंकू सिंगने १२ धावा केल्या, सुयश शेडगेने १० धावा केल्या, तर हर्षित राणा शून्यावर बाद झाला.
श्रीलंकेची गोलंदाजी
श्रीलंका अ संघाने या सामन्यात प्रथम गोलंदाजी केली. लसिथ क्रूसपुल्लेने चांगल्या फॉर्मात असलेल्या वैभव सूर्यवंशीला बाद करत श्रीलंकेच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर भारताने सहजपणे विकेट मिळू दिल्या नाहीत. रविंदू फर्नांडोने महत्त्वाच्या दोन विकेट्स पटकावल्या, तर निपुण धनंजयनेही दोन विकेट घेतल्या.
प्रतिक्रिया व्यक्त करा