दीड महिन्यानंतर लेक घरी परतली
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण बाबा झाला आहे. सूरज आणि त्याची पत्नी संजना यांच्या आयुष्यात जन्माष्टमीच्या दिवशी छोटी राधा आली. बाळाच्या जन्मानंतर सूरजच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर चिमुकली काही दिवस आजोळी होती. आता दीड महिन्यानंतर ती आपल्या हक्काच्या घरी, वडिलांकडे परतली आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर धुमधडाक्यात स्वागत
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सूरज चव्हाणने आपल्या लाडक्या लेकीला घरी आणले. ‘माझी लाडाची लक्ष्मी आली…’ अशा भावना त्याने यावेळी व्यक्त केल्या. घरी तिचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. या स्वागताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात गोजिऱ्या बाळाची झलक पाहायला मिळत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply