मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ रेल्वे स्थानकाला इंडियन ग्रीन बिल्डिंग काउंसिलकडून सुवर्ण मानांकन मिळाले आहे. स्थानकाच्या ऊर्जा कार्यक्षम पायाभूत सुविधा, शाश्वत वैशिष्ट्ये आणि प्रवासी सुविधांची दखल घेत हे मानांकन देण्यात आले आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने रेल्वे स्थानक सुधारणा कार्यक्रमांतर्गत या स्थानकाचा विकास केला आहे. या महिन्यात झालेल्या अंतिम मूल्यांकनानंतर स्थानकाला हे मानांकन जाहीर झाले आहे.
ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक सुविधा
ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि प्रवाशांसाठी आधुनिक सुविधांचा समावेश केल्यामुळे नेरळ स्थानकाला हे मानांकन मिळाले आहे.
प्रवाशांसाठी आधुनिक सोयी
स्थानकावर ४ सरकते जिने, ५ लिफ्ट आणि ४३७ प्रवाशांसाठी बसण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
Leave a Reply