मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात फटाके वाजवून सेलिब्रेशन केले होते.
सेलिब्रेशन प्रचंड गाजले
ठाण्याच्या आवारात फटाके वाजवून केलेले हे सेलिब्रेशन प्रचंड गाजले होते. या घटनेनंतर आता संबंधित महिला कॉन्स्टेबलचीही अंधेरी पोलीस ठाण्यातून बदली करण्यात आली आहे. तिची बदली मरोल येथे करण्यात आली आहे.
वरिष्ठांविरोधात तक्रार
या महिला कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर महिला कॉन्स्टेबलचीही बदली झाल्याने अंधेरी पोलीस ठाण्यातील घडामोडींची चर्चा पुन्हा रंगली आहे.
Leave a Reply