हिवाळ्यात थंडी वाढली की हात गारठणे ही सामान्य समस्या होते. अशा वेळी शेकोटी किंवा हीटरशिवायही हात गरम ठेवता यावेत, यासाठी एक छोटेसे पॉकेट गॅजेट उपयोगी ठरू शकते. रिचार्जेबल हँड वॉर्मर असे या उपकरणाचे नाव आहे.
हे उपकरण खिशात सहज मावेल इतके छोटे असून, बॅटरीच्या मदतीने ते उष्णता निर्माण करते. त्यात असलेला इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट बॅटरीमधून मिळणाऱ्या विजेचे उष्णतेत रूपांतर करतो आणि त्यामुळे हातांना उब मिळते.
काही सेकंदांत मिळते उब
हे उपकरण सुरू केल्यानंतर काही मॉडेल्समध्ये काही सेकंदांतच उष्णता जाणवू लागते. त्यामुळे बाहेर फिरताना, प्रवासात किंवा थंड हवामानात काम करताना हे गॅजेट हात गरम ठेवण्यासाठी सोयीचे ठरते. रिचार्ज करता येत असल्याने ते पुन्हा पुन्हा वापरता येते.
हिवाळ्यात हात गरम ठेवण्यासाठी शेकोटी किंवा हीटरची गरज भासू नये, अशा पद्धतीने हे छोटे उपकरण तयार करण्यात आले आहे.
Leave a Reply