भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांमध्ये खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन न करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वादावर मेरिलिबोन क्रिकेट क्लबने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राजकीय परिस्थितीचा खेळावर परिणाम
राजकीय परिस्थितीचा प्रभाव खेळावर पडत असेल, तर खेळाडूंना हस्तांदोलन करण्यास भाग पाडणे आपल्या नियंत्रणात नसल्याचे क्लबने मान्य केले आहे. वरून आदेश आल्यास हस्तक्षेप करणे अशक्य असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
खेळाडूवृत्ती कायम राहावी
मात्र क्रिकेटमधील खेळाडूवृत्ती आणि परस्पर सन्मान कायम राहावा, अशी अपेक्षाही क्लबने व्यक्त केली आहे. हँडशेकच्या मुद्द्यामागे खूप मोठे मुद्दे असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
Leave a Reply