भारत दौऱ्यावर असलेले नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांचे दौऱ्याच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवशी राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाह यांना भारताच्या सांस्कृतिक आणि कलात्मक परंपरेची ओळख करून देणाऱ्या तीन खास भेटवस्तू दिल्या.
तीन खास भेटवस्तू
मोदी यांनी दिलेल्या भेटवस्तूंमध्ये कलमकारी शैलीतील ‘संपूर्ण रामायण’ ही चित्रकृती, बनारसी ब्रोकेड सिल्क स्टोल आणि पितळी कलशातील काशीचे गंगाजल यांचा समावेश आहे. कलमकारी चित्रकृतीतून रामायणातील प्रसंग साकारण्यात आले आहेत.
दोन देशांमधील सांस्कृतिक नाते
या भेटवस्तू अयोध्या ते जनकपूर आणि काशी ते काठमांडू या दोन देशांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नात्याचे प्रतीक आहेत. भेटवस्तूंच्या माध्यमातून भारताच्या समृद्ध कलात्मक परंपरेची ओळख नेपाळच्या पंतप्रधानांना करून देण्यात आली.
Leave a Reply