जिओला दहा वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने कंपनीने ग्राहकांसाठी नवे रिचार्ज प्लॅन आणि बंपर ऑफर आणल्या आहेत. आता ग्राहकांना अवघ्या १५ रुपयांपासून रिचार्ज करता येणार आहे. हॅपी न्यू इयर या नावाने आणलेल्या नव्या प्लॅनमध्ये ३९९ आणि ३,९९९ रुपयांच्या रिचार्जचा समावेश आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड ४जी आणि ५जी डेटा मिळणार आहे.
छोटे अॅड-ऑन पॅक
जास्त इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी जिओने दोन छोटे अॅड-ऑन पॅक आणले आहेत. १५ रुपयांच्या पॅकमध्ये एका दिवसासाठी, तर २५ रुपयांच्या पॅकमध्ये दोन दिवसांसाठी अनलिमिटेड ५जी डेटा मिळेल. रात्री उशिरापर्यंत इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी ५० रुपयांचा नाईट डेटा पॅकही आणण्यात आला आहे. या पॅकची वैधता २८ दिवस असेल. दररोज रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत अनलिमिटेड ४जी आणि ५जी डेटा वापरता येईल आणि हा डेटा मुख्य डेटामधून कापला जाणार नाही.
३९९ आणि ३,९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळणार?
जिओचा ३९९ रुपयांचा प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह आहे. यामध्ये अनलिमिटेड ४जी आणि ५जी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. यासोबत १२ महिन्यांसाठी कॅनव्ह, जिओ हॉटस्टार, जिओगेम्स आणि जिओ क्लाऊडवर ५० जीबी स्टोरेज मिळणार आहे. ३,९९९ रुपयांच्या वार्षिक प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची आहे. यातही अनलिमिटेड ४जी आणि ५जी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळणार असून त्याचसोबत इतर अनेक ऑफरही मिळणार आहेत.
३९९ आणि ३,९९९ रुपयांचे प्लॅन २४ नोव्हेंबर २०२६ पासून उपलब्ध होणार आहेत. २५ रुपयांचा ५जी अॅड-ऑनही याच दिवशी सुरू होणार आहे. १५ रुपयांचा पॅक आधीपासूनच उपलब्ध आहे, तर ५० रुपयांचा नाईट पॅक २६ नोव्हेंबरपासून रिचार्ज करता येणार आहे.
Leave a Reply