राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजही पूर्णपणे सक्रिय असून त्यांच्या निवृत्तीची चर्चा करणे योग्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. पवार हे वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये आणि कामांमध्ये आजही रस घेत असतात, त्यामुळे निवृत्तीचा विषय काढणे अयोग्य असल्याचे फडणवीस म्हणाले. आयुष्यभर ते थांबणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.
एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर भाष्य
माध्यमांमध्ये सध्या शरद पवार निवृत्त होऊन त्यांचा पक्ष एनडीएमध्ये सामील होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चांवर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही चर्चा फेटाळून लावली. पवारांच्या पक्षाच्या एनडीएतील संभाव्य प्रवेशाबाबत आणि पक्षांतर्गत मंथनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही त्यांनी आपली भूमिका मांडली.
दुसरीकडे या चर्चांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी पवारांच्या एनडीए प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली. सत्तेत जाण्याची घाई करणाऱ्यांना त्यांनी टोला लगावला आहे. त्यामुळे पवारांच्या राजकीय भविष्याभोवतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
Leave a Reply