भारतात खाद्यपदार्थांच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. डाळ, साखर आणि तांदळासह इतर पदार्थांच्या किमतीमध्येही वारंवार वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तांदळाचे दर नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा विचार केला आहे.
कोणत्या तांदळावर शुल्क?
केंद्र सरकार देशांतर्गत साठा वाढवण्यासाठी तांदळाच्या काही खास जातींच्या निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा विचार करत आहे. कणी म्हणजेच तुकडा तांदूळ आणि काही महागड्या नॉन-बासमती तांदळाच्या प्रकारांवर हे शुल्क लागू होऊ शकते. या जातींचा काही भागात तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे.
अंतिम निर्णय बाकी
या प्रस्तावावर संबंधित मंत्रालयांशी चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. शुल्क लागू झाल्यास निर्यात महाग होईल आणि देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढण्यास मदत होईल, असा अंदाज आहे. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही.
Leave a Reply