गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण सुरू होती. या घसरणीनंतर काल सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आणि आजही ही वाढ कायम असल्याचे दिसत आहे. मुंबईत आज, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सोने आणि चांदीचे नवे दर जाहीर झाले आहेत.
मुंबईतील आजचे सोन्याचे दर
मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२६,५७० रुपये इतका झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,१६,०२० रुपये आहे, तर १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९४,९३० रुपये इतका आहे.
काल एकाच दिवसात अडीच हजारांची वाढ
सोन्याचा दर २ लाख रुपयांच्या आसपास गेल्यानंतर भविष्यात तो कमी होणार नाही, असा अंदाज होता. मात्र त्यानंतर अचानक सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आणि सोने १ लाख २४ हजार रुपयांपर्यंत पोहोचले. सोन्याचा दर १ लाखाच्या आत जाण्याचा अंदाज असताना काल सोन्याने झेप घेतली आणि एकाच दिवसात सोन्याचा भाव अडीच हजार रुपयांनी वाढला. त्यामुळे सोने खरेदीची वाट पाहणाऱ्या अनेकांची निराशा झाली. आजही सोन्याने पुन्हा वाढ नोंदवली आहे.
Leave a Reply