राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळल्याची चर्चा सुरू झाली आहे. नागपुरात रोहित पवार यांनी विधानभवनावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र या मोर्चावरून खासदार सुप्रिया सुळे नाराज झाल्याचे म्हटले जात आहे.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता मोर्चाची घोषणा करण्यात आल्याची माहिती मिळत असल्याचे सांगितले जात आहे. नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेबाबतही वरिष्ठांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप रोहित पवार यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे रोहित पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये दुरावा वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर?
या घडामोडीमुळे शरद पवार गटातील अंतर्गत धुसफूस समोर आल्याचे दिसत असल्याचे बोलले जात आहे. ही बातमी अजूनही विकसित होत असून याबाबत अधिक माहिती येणे बाकी आहे.
Leave a Reply