मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सोनं-चांदी स्वस्त; ग्राहकांची प्रतीक्षा कायम

संभाजीनगरच्या सराफा बाजारात सोनं तोळ्यामागे १५ हजारांनी, तर चांदी किलोमागे ६० हजारांनी स्वस्त झाली. तरीही ग्राहक आणखी दर उतरण्याच्या प्रतीक्षेत सध्या आहेत.

सोनं-चांदी स्वस्त; ग्राहकांची प्रतीक्षा कायम

छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आठ ते दहा दिवसांत सोनं तोळ्यामागे १५ हजारांनी, तर चांदी किलोमागे ६० हजारांनी स्वस्त झाली आहे. एवढी मोठी दरकपात होऊनही ग्राहकांनी खरेदीसाठी घाई करण्याऐवजी आणखी भाव उतरतील, या अपेक्षेने प्रतीक्षा करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे दर कमी, पण बाजारातील खरेदीही कमी, असे विरोधाभासी चित्र सराफा बाजारात पाहायला मिळत आहे.

दर किती उतरले?

काही दिवसांपूर्वी सोन्याने तोळ्यामागे १ लाख ४५ हजार रुपयांचा, तर चांदीने किलोमागे २ लाख २५ हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. आता सोन्याचे दर १ लाख ३० हजार, तर चांदीचे दर १ लाख ६५ हजार रुपयांवर आले आहेत. या घसरणीमुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदीचे नियोजन करणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, दर आणखी खाली येतील का, याचा अंदाज घेत ग्राहकांनी सध्या खरेदी लांबणीवर टाकली आहे.

दर घसरले, तरी खरेदी मंदावली

सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर सराफा बाजारात खरेदी वाढेल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांकडून मोठ्या खरेदीला प्रतिसाद मिळत नाही. सतत बदलणाऱ्या दरांमुळे ग्राहक संभ्रमात असून, दर स्थिर झाल्यानंतरच खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.

अमेरिकेतील व्याजदरविषयक धोरणाचा आणि बँकांमधील गुंतवणुकीवरील मौल्यवान धातूंच्या किमतीवर परिणाम होत आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळणारा गुंतवणुकदारांचा कल कमी झाल्याने मागणीवर परिणाम होत आहे. सोन्या-चांदीचे दर कमी झाले असले तरी ग्राहक अद्याप प्रतीक्षेत आहेत. दर स्थिर झाल्यानंतरच बाजारात खरेदी वाढेल, असे छत्रपती संभाजीनगर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक म्हणाले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance