ओटीटीवर पुन्हा एकदा हास्य आणि ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा धुरळा उडणार आहे. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेल्या ‘पंचायत’च्या पाचव्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ही वेबसीरिज ३ डिसेंबर रोजी अमॅझोन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मंजू देवी, सचिवजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे पुढे काय होणार, याची झलक ट्रेलरमध्ये दिसते. फुलेरामध्ये सत्ताबदल झाला असून, नवी सत्ता आणि नव्या युगासह ही मालिका नव्या सीझनसह परत येत आहे.
ट्रेलरमध्ये काय दिसते?
फुलेरामध्ये भूषण आणि क्रांती देवी यांची सत्ता आल्यानंतर सचिवजी आणि त्यांच्या टीमचे चांगलेच हाल सुरू आहेत. भूषण सत्तेचा पुरेपूर फायदा घेत सचिवजी आणि विकास यांना कामाला जुंपतो. दुसरीकडे, रिंकी आणि सचिवजी यांच्या प्रेमाची कहाणी नेमकी भूषणलाच समजते. त्यामुळे या सीझनमध्ये मनोरंजन आणि कुरघोड्यांचा धमाका पाहायला मिळणार आहे. प्राइम व्हिडिओने हा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित केला असून, प्रेक्षकांना भावनांचा समृद्ध मिलाफ, हृदयस्पर्शी क्षण आणि ग्रामीण भारताची प्रामाणिक झलक अनुभवायला मिळेल, असे सांगण्यात आले आहे.
कलाकार आणि निर्मिती
या सीझनचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले असून, निर्मिती दीपक कुमार मिश्रा, चंदन कुमार आणि अरुणाभ कुमार यांनी केली आहे. लेखन चंदन कुमार यांचे आहे. ‘द व्हायरल फीवर’ (टीव्हीएफ) ने या सीझनची निर्मिती केली आहे. यामध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, सुनीता राजवार, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार आणि अशोक पाठक हे कलाकार आहेत. हा सीझन ३ डिसेंबर २०२६ रोजी भारतात आणि जगभरातील २४० देशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.
Leave a Reply