वाहन खरेदी केल्यानंतर विमा काढणे प्रत्येक वाहनधारकासाठी महत्त्वाचे असते. मात्र, वाहन विम्याच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. १५ डिसेंबरपासून वाहन विम्याची नवी व्यवस्था लागू होणार असून, विमा पॉलिसीचे चार स्वतंत्र भाग केले जातील. त्यामुळे वाहनधारकांना नेमके कोणते संरक्षण मिळते, हे समजणे सोपे होणार आहे.
विम्याचे चार भाग कोणते
नव्या नियमानुसार वाहन विम्याचे चार प्रकार करण्यात आले आहेत. यामध्ये थर्ड पार्टी विमा, वैयक्तिक अपघात विमा, प्रवासी विमा आणि वाहनाचे नुकसान संरक्षण यांचा समावेश आहे. प्रत्येक भागाचे संरक्षण वेगवेगळे असल्याने वाहनधारकांना आपल्या गरजेनुसार विमा निवडता येणार आहे.
अनिवार्य आणि ऐच्छिक विमा
या चार भागांपैकी दोन विमे अनिवार्य असतील, तर दोन विमे ऐच्छिक असणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांना कोणता विमा घेणे बंधनकारक आहे आणि कोणता आपल्या इच्छेनुसार घेता येईल, हे स्पष्टपणे कळणार आहे. कार आणि दुचाकीधारकांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरणार असून, १५ डिसेंबरपासून नवी व्यवस्था लागू होणार आहे.
Leave a Reply