सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

शक्तीपीठ महामार्ग: मॅपिंग रोखलं, आंदोलक ताब्यात

भुदरगड तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगला शेतकऱ्यांनी विरोध केला. प्रशासनाचा प्रयत्न रोखण्यात आला असून, २०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शक्तीपीठ महामार्ग: मॅपिंग रोखलं, आंदोलक ताब्यात

शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यात शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शेळोली गावात मॅपिंगसाठी आलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांनी विरोध केला आणि मॅपिंगचा प्रयत्न हाणून पाडला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुमारे २०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

शेळोली, मडूर आणि करडवाडीत विरोध कायम

भुदरगड तालुक्यातील शेळोली, मडूर आणि करडवाडी या गावांतून प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. आज शेळोलीतील शिवलीकरवाडी परिसरात प्रशासनाकडून मॅपिंगचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शेतकरी एकत्र येऊन त्यांनी हा प्रयत्न रोखला. घटनास्थळी डीवायएसपी विवेक पाटील, प्रांताधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन भुदरगड पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केलं.

कोणत्याही परिस्थितीत भुदरगड तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होऊ देणार नाही, असा इशारा संघर्ष समितीचे समन्वयक सम्राट मोरे आणि मच्छिंद्र मोरे यांनी दिला आहे. दरम्यान, उद्या म्हणजेच २४ नोव्हेंबरला भुदरगड प्रांताधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance