पुरुष जास्त खोटं बोलतात की महिला, हा प्रश्न अनेकदा चर्चेत येतो. मात्र खोटं बोलण्यामागची कारणं दोघांची वेगवेगळी असतात. मानसिकतेच्या दृष्टीने पाहिलं तर पुरुष आणि महिला वेगवेगळ्या कारणांसाठी सत्य लपवतात. ही कारणं समजून घेतली तर नात्यांमधील गैरसमजही कमी होऊ शकतात.
पुरुष खोटं का बोलतात?
काही पुरुष स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी ती लपवतात. आपल्यावर दोष येऊ नये म्हणून ते घरात किंवा ऑफिसमध्ये खोटं बोलू शकतात. काही पुरुषांना समाजात आपली प्रतिमा चांगली ठेवायची असते. त्यामुळे ते आपला पगार, नोकरी, यश किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल खोटं सांगतात. तसंच काही पुरुषांना घरातील किंवा ऑफिसमधील जबाबदाऱ्या टाळायच्या असतात, त्यामुळे खरी परिस्थिती सांगण्याऐवजी ते वेगवेगळी कारणं देतात.
महिला खोटं का बोलतात?
काही महिला समोरच्या व्यक्तीचं मन दुखावू नये म्हणून खोटं बोलतात. उदाहरणार्थ, एखादी भेटवस्तू आवडली नसली तरी समोरच्याला बरं वाटावं म्हणून ती आवडल्याचं सांगतात. कुटुंबात किंवा नात्यांमध्ये वाद होऊ नयेत, असं काही महिलांना वाटतं. त्यामुळे त्या भांडण टाळण्यासाठी काही गोष्टी सांगत नाहीत. काही महिलांना आपलं मन मोकळं केल्यावर समोरची व्यक्ती काय विचार करेल, याची भीती वाटते. त्यामुळे त्या आपल्या भावना आणि काही गोष्टी लपवतात. तसंच छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद घालायला आवडत नाही, म्हणून खर्च, मैत्री किंवा वैयक्तिक निर्णयांबद्दल वारंवार प्रश्न विचारले जाऊ नयेत म्हणून त्या काही गोष्टी लपवतात.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि खोटं बोलण्यामागची कारणं व्यक्तीनुसार बदलू शकतात. त्यामुळे कोणत्याही एका कारणावरून सर्व पुरुष किंवा सर्व महिला यांच्याबद्दल निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही.
Leave a Reply