सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

लिंबू ६ महिने ताजे ठेवण्याची सोपी युक्ती, रसही टिकेल

लिंबू फक्त १५ दिवस ताजे राहतात, पण एका सोप्या युक्तीने ते सहा महिने ताजे आणि रसरशीत ठेवता येतात. लिंबू स्वस्त असताना खरेदी करा आणि ही पद्धत आजच वापरा.

लिंबू ६ महिने ताजे ठेवण्याची सोपी युक्ती, रसही टिकेल

लिंबू जवळपास प्रत्येकाच्या जेवणात लागते. फक्त जेवणच नाही, तर लिंबापासून अनेक गोष्टी तयार होतात. उन्हाळ्यात लिंबू शरबत तर एक वरदानच असते. पण लिंबाचा एक सिझन असतो. तो सिझन संपल्यानंतर बाजारात लिंबू मिळत नाहीत किंवा खूप जास्त महाग मिळतात. लिंबू जास्तीत जास्त पंधरा दिवस ताजे राहतात. त्यापेक्षा अधिक काळ राहिले तर त्याचा रस कमी होतो. ज्यावेळी लिंबाची मागणी कमी होते, त्यावेळी बाजारात लिंबू खूप महाग मिळतात. लिंबाची आवक वाढली की, बाजारात लिंबू अत्यंत स्वस्त दरात मिळतात. पण लिंबू फार काळ टिकत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यातच आता एक असा जुगाड आहे, ज्यामुळे लिंबू सहा महिने ताजी राहतील.

लिंबू सहा महिने ताजे कसे ठेवावे?

लिंबू स्वस्त मिळतात, त्यावेळी लिंबू मोठ्या संख्येने खरेदी करा आणि सहा महिने त्यांना ताजेच ठेवा. याकरिता फार काही करण्याची गरज नाही. लिंबू सहा महिन्यांसाठी साठवून ठेवायची असतील, तर आधी लिंबू स्वच्छ धुवून घ्यावीत. एकदम स्वच्छ धुवावीत, घाण अजिबात राहिली नाही पाहिजे. लिंबू स्वच्छ धुतल्यानंतर ती कोरडी करून घ्यावीत. त्यानंतर लिंबांना खाण्याचे तेल लावावे. हे लक्षात ठेवावे की, लिंबांना तेल पूर्ण बाजूने लागले पाहिजे. त्यानंतर एक डब्बा घ्यावा आणि सुती कपड्यामध्ये लिंबू गुंडाळून ठेवावीत. डब्ब्याचे झाकण व्यवस्थित बंद करावे.

जर काही आठवड्यांसाठी लिंबू चांगली ठेवायची असतील, तर सुती कपड्यात ती बांधून फ्रीजमध्ये ठेवता येतात. बरेच लोक माहिती नसल्याने लिंबू साठवून ठेवण्यापेक्षा त्याचा रस काढून एका बाटलीमध्ये फ्रीजमध्ये ठेवतात. मात्र, लिंबाच्या रसापेक्षा लिंबू साठवून ठेवलेले कधीही जास्त फायदेशीर ठरते. लिंबू ताजे साठवून ठेवण्यासाठी ही खास पद्धत आहे.

लिंबाचे आरोग्यदायी फायदे

लिंबामध्ये व्हिटामिन सी जास्त असते. लिंबू खाल्ल्याने व्हिटामिन सीची कमतरता दूर होते. शिवाय लिंबू पदार्थांमध्ये टाकल्याने पदार्थांची चव बदलते. त्वचेच्या अनेक समस्यांवर लिंबू हा उपाय आहे. लिंबू आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात, असे मानले जाते.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance