गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यांच्यासोबतच त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांनाही धमकी देण्यात आली आहे. मात्र या धमक्यांना न घाबरता अमिताभ बच्चन घराबाहेर पडले असून, त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
लेकाची नवी गाडी स्वतः चालवत बाहेर पडले
अभिषेक बच्चन यांनी याच वर्षाच्या सुरुवातीला नवी लँड रोव्हर डिफेंडर ऑक्टा खरेदी केली होती. तांबूस रंगाची ही एसयूव्ही अमिताभ बच्चन यांनी स्वतः चालवत घरातून बाहेर पडले. गाडीत ते एकटेच होते; त्यांच्यासोबत इतर कोणीही नव्हते. गाडीच्या काचाही काळ्या करण्यात आल्या नव्हत्या. बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना हात दाखवला आणि छायाचित्रकारांनाही अभिवादन केले.
डिफेंडर ऑक्टा किती खास?
डिफेंडर ऑक्टा ही कंपनीची सर्वात शक्तिशाली आणि सर्वात महागडी एसयूव्ही मानली जाते. गेल्या वर्षीच ही गाडी भारतात दाखल झाली होती. यात 11.4 इंच टचस्क्रीन, छोटा रेफ्रिजरेटर आणि उत्तम ध्वनी यंत्रणा यांसारख्या सुविधा आहेत. भारतात या गाडीची किंमत 2.62 कोटी रुपयांपासून सुरू होते. बच्चन कुटुंबीयांकडे डिफेंडर 130 आणि डिफेंडर 110 या गाड्याही आहेत.
Leave a Reply