सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पुणे महामार्गावर भीषण अपघात; तीन तरुणांचा मृत्यू

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोलीजवळ मध्यरात्री भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली. अपघातात तीन तरुणांचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले. पोलिस तपास करत आहेत.

पुणे महामार्गावर भीषण अपघात; तीन तरुणांचा मृत्यू

पुण्यामध्ये भरधाव कारला भीषण अपघात झाला. या अपघातात ३ तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना पुणे-अहिल्यानगर महामार्गावर घडली. भरधाव कार डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर ती दुसऱ्या मार्गिकेवर जाऊन उलटली. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आणि कारमधील ३ तरुणांनी जागीच प्राण सोडले. गंभीर जखमी झालेल्या २ तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. पोलीस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोली हद्दीत विठ्ठलवाडी कमानीजवळ मध्यरात्री १.२५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर ओलांडून महामार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेवर उलटली. त्यानंतर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेत सुमारे ६० ते ७० मीटर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. या अपघातात ३ तरुणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.

मृत आणि जखमी तरुणांची माहिती

या भीषण अपघातात ओमकार अजय सूर्यवंशी (वय २४ वर्षे), शंकर वासुदेव ढोळे (वय २२ वर्षे) आणि मयूर सतीश औटी (वय २६ वर्षे) या ३ तरुणांचा मृत्यू झाला. तिघेही वाघोली येथील फूलमळा रोड परिसरातील रहिवासी होते. या अपघातात आशुतोष नंदकुमार मरकड (वय २८ वर्षे) आणि प्रणय भरत शिंदे (वय २४ वर्षे) हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना वाघोली येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मृत तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. वाघोली पोलिसांनी या घटनेची नोंद करत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातामुळे ३ तरुणांचा मृत्यू झाल्याने वाघोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance