सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

बिसलेरीचे पाणी चाचणीत फेल; FSSAI कडून खटल्याला मंजुरी

बिसलेरी पाण्याचे नमुने दोनदा चाचणीत फेल ठरले असून, हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले. FSSAI कडून बिसलेरीवर खटला चालवण्यास मंजुरी मिळाली आहे.

बिसलेरीचे पाणी चाचणीत फेल; FSSAI कडून खटल्याला मंजुरी

बाहेर गेल्यावर किंवा घरात पाणी नसेल तेव्हा अनेकजण बिसलेरीचे पाणी विकत घेतात. डोळे झाकून विश्वास ठेवून घेतले जाणारे हे पाणी आता चाचणीत फेल ठरले आहे. पाण्याच्या तपासणीमध्ये बिसलेरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे समोर आले असून, आता भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून (FSSAI) बिसलेरीवर खटला चालवण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.

चाचणीत नेमके काय आढळले?

पाण्याचे नमुने दोनदा चाचणीमध्ये फेल ठरले असून, हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. पहिल्या तपासणीत पाण्यामध्ये ब्रोमेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले होते. तर दुसऱ्या चाचणीत पाण्यामध्ये पीएचएस (PHS) हा कॅन्सरकारक घटक आढळून आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या पाण्याच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नमुने थेट कंपनीतून घेतले

महत्त्वाचे म्हणजे, हे नमुने बाजारातून विकत न घेता थेट बिसलेरी कंपनीतून तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यानंतर बिसलेरीवर न्यायालयात खटला चालवण्यास एफएसएसएआयकडून मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पुढे जाणार आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance