रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

धुळ्यात खळबळ! महापौरांनी विष प्राशन केलं; प्रकृती स्थिर

धुळ्याच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सोशल मीडियावरील बदनामीला कंटाळल्याचं सांगितलं जातंय. प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.

धुळ्यात खळबळ! महापौरांनी विष प्राशन केलं; प्रकृती स्थिर

धुळे महानगरपालिकेच्या भाजपच्या महिला महापौर मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट येत होत्या, त्याला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी माहिती दिली.

महापौरांची प्रकृती स्थिर

सध्या महापौरांवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याची माहिती आमदारांनी दिली आहे. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही समजतं. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance