उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथे एका सरकारी कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ झाला. खासदार जगदंबिका पाल आणि अपना दल (एस) चे आमदार विनय शर्मा यांचे समर्थक एकमेकांशी भिडले. या झटापटीत आमदाराला मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
वाद कशावरून सुरू झाला?
ही घटना बरहनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पायाभरणी समारंभादरम्यान घडली. व्यासपीठावरून आमदाराचं नाव घेतलं गेलं नाही, यावरून वाद सुरू झाला. पाहता पाहता या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.
आमदारांची पोलिसांकडे मागणी
आमदारांनी आरोप केला आहे की, त्यांचे कार्यकर्ते प्रदीप यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांनी या प्रकरणी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर कार्यक्रमात काही काळ गोंधळाचं वातावरण होतं.
Leave a Reply