नंदुरबार जिल्ह्यातील शहादा-खेतिया रस्त्यावर भीषण अपघात झाला. सुलतानपूर फाट्याजवळ भरधाव आर्टिगा कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ब्राह्मणपुरी येथील १८ वर्षीय निलेश विनोद वरसाळे याचा जागीच मृत्यू झाला.
काम आटोपून घरी परतत होता
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश काम आटोपून घरी परतत होता. घरापासून अवघे दोन किलोमीटर अंतर शिल्लक असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला. अपघाताची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भरधाव वाहनामुळे झालेल्या या अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती मिळत आहे.
Leave a Reply