छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. त्याच्या कॉमेडीच्या टायमिंगने चाहत्यांच्या मनात अक्षरशः घर केले आहे. नुकताच एका मुलाखतीमध्ये कुशलने त्याच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे. कुशलने थेट त्याची शेवटची इच्छा सांगितली आहे.
## चित्रपटाच्या मुलाखतीत खुलासा
काही दिवसांपूर्वी कुशल बद्रिकेचा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रदर्शनावेळी त्याने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला. आरपारला दिलेल्या मुलाखतीत कुशल बद्रिकेने त्याची शेवटची इच्छा सांगितली आहे. विजू माने, संतोष जुवेकर आणि अभिजीत चव्हाण यांच्याकडे बोट करत कुशल म्हणाला की, त्यांना माहिती आहे, त्यांना सांगून ठेवली आहे माझी शेवटची इच्छा काय आहे ते.
## मोबाईल फोडा, जाळा, राख समुद्रात टाका
तेवढ्यात विजू माने म्हणतात की, तो ९८ व्या वर्षी वृद्धापकाळाने जाणार आहे. आपल्याला कळलं की हा मरतोय, हा जाणार. त्यावेळेला आपण काय करायचं, याला पाणी पाजायचं का, तर नाही. हॉस्पिटलला न्यायचं का, नाही. डॉक्टर बोलवायचे का, तर नाही. पहिलं काय करायचं, तर याचा मोबाईल घ्यायचा आणि तो फोडायचा. तो जाळायचा, त्याची राख समुद्रात टाकायची, ही याची इच्छा आहे.
कुशल बद्रिकेची शेवटची इच्छा ऐकून अनेकांना हसू आले आहे. पुढे या मुलाखतीत बोलताना कुशल म्हणाला की, हे सगळं झाल्यावर मग मला वाचवायला या, असं तो गंमतीने म्हणाला.
Leave a Reply