बाइक चालवताना टायरमधील हवेचा दाब योग्य असणे खूप महत्त्वाचे असते. टायरमध्ये हवा कमी किंवा जास्त असल्यास त्याचा थेट परिणाम बाइकच्या कामगिरीवर आणि टायरच्या आयुष्यावर होतो. त्यामुळे टायरमधील हवा वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे.
कमी हवा भरल्यास काय होते
टायरमध्ये हवा कमी असल्यास बाइक चालवताना टायर रस्त्यावर जास्त दाबला जातो. यामुळे बाइक चालवताना पेट्रोल जास्त खर्च होऊ शकते. तसंच टायर लवकर गरम होऊन खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कमी हवेत बाइक चालवणे टायरसाठी आणि खिशासाठीही नुकसानकारक ठरू शकते.
जास्त हवा भरल्यास नुकसान
टायरमध्ये गरजेपेक्षा जास्त हवा भरल्यास टायरचा रस्त्याशी संपर्क कमी होऊ शकतो. त्यामुळे खड्डे किंवा खराब रस्त्यावर बाइक चालवताना जास्त धक्के जाणवतात. टायरच्या मधल्या भागाची झीज लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त हवा भरणेही टाळावे.
हवा किती दिवसांनी तपासावी
बाइकच्या टायरमधील हवा किमान १५ दिवसांतून एकदा तपासावी. लांबचा प्रवास करणार असाल तर प्रवास सुरू करण्यापूर्वी हवेचा दाब तपासून घ्यावा. शक्यतो टायर थंड असताना हवा तपासावी, म्हणजे दाबाचे योग्य मोजमाप मिळते.
Leave a Reply