राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. कोटा-उदयपूर महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ हा अपघात घडला. भाविकांची क्रूझर व्हॅन रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली.
खाटू श्याम दर्शनासाठी निघालेले भाविक
अपघातग्रस्त वाहनातील प्रवासी खाटू श्याम मंदिराच्या दर्शनासाठी निघाले होते, असे सांगण्यात येते. महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला व्हॅनची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा चुराडा झाला. या अपघातात नऊ जणांनी जागीच प्राण गमावले.
एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू
मृत झालेले नऊ जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येते. हे कुटुंब धुळ्यातील असल्याची माहिती आहे. अपघातात जखमी झालेले आठ जण गंभीर असल्याचे सांगण्यात येते. अपघाताची ही बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a Reply