बारामती एमआयडीसी परिसरात आज सायंकाळी गोळीबाराची घटना घडली. शिवशंभोनगर परिसरात राहणाऱ्या उद्योजक राजन कोळेकर यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी घराजवळ येत दोन राऊंड फायर केल्याची माहिती आहे.
सायंकाळी सहाच्या सुमारास घटना
ही घटना आज सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. अज्ञात हल्लेखोरांनी उद्योजकाच्या घराजवळ येत त्यांच्या कारवर दोन राऊंड फायर केले. सुदैवानं या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही.
परिसरात खळबळ
एमआयडीसीसारख्या वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हल्लेखोर कोण होते, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Leave a Reply