शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

भाजपला धक्का; मयूरसिंह पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

इंदापूर तालुक्यात भाजपचे नेते मयूरसिंह पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे इंदापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

भाजपला धक्का; मयूरसिंह पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

राज्यातील पक्षांतराच्या घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे. एका पक्षाचे नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असून, गेल्या काही दिवसांत अशा अनेक घडामोडी घडल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी पालघरमध्ये भाजपने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला. माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणुकीनंतर एकमेकांचे नेते एकमेकांच्या पक्षात घ्यायचे नाहीत, असं ठरलं असतानाही वनगा यांनी भाजपात प्रवेश केला. यावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि दखल घेतली जाईल, असं त्यांनी म्हटलं होतं.

रायगडमध्ये राष्ट्रवादीचा धक्का

शुक्रवारी रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेना शिंदे गटाला धक्का दिला. खासदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पुण्यात भाजपला धक्का

आता पुण्यातूनही मोठी बातमी समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील भाजपचे पुणे जिल्ह्यातील नेते मयूरसिंह पाटील यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपसाठी इंदापूरमध्ये हा मोठा धक्का मानला जात आहे. मयूरसिंह पाटील हे भाजपचे कोअर कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होते. पक्ष संघटनेत त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासोबतच सहकार क्षेत्रातही त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसंच इंदापूर तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन म्हणून काम पाहिलं आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा आहे. त्यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance