सोने खरेदी करताना दागिन्यांवर लिहिलेला कॅरेट हा आकडा अनेकांना गोंधळात टाकतो. 24, 22 आणि 18 कॅरेट म्हणजे नेमकं काय, आणि या आकड्यांमागचं शुद्धतेचं गणित कसं असतं, हे समजून घेतलं तर खरेदी करताना योग्य निर्णय घेणं सोपं जातं.
18 कॅरेट सोन्यात किती सोने असतं?
18 कॅरेट सोन्यात 24 पैकी 18 भाग सोने असतं आणि उरलेले 6 भाग इतर धातूंनी भरलेले असतात. त्यामुळे त्यात 75 टक्के सोने असतं. 18 कॅरेट सोन्याचा हॉलमार्क क्रमांक 750 असतो. इतर धातू मिसळल्यामुळे हे सोने अधिक मजबूत बनतं, त्यामुळे दागिने बनवण्यासाठी ते अधिक टिकाऊ मानलं जातं.
कॅरेटचं गणित कसं समजायचं?
कॅरेटचं मोजमाप 24 या आकड्यावर आधारलेलं असतं. 24 पैकी किती भाग शुद्ध सोने आहे, यावरून कॅरेट ठरतं. याच गणितानुसार 22 कॅरेट सोन्यात सुमारे 91.6 टक्के सोने असतं. दागिने खरेदी करताना हॉलमार्क क्रमांक तपासणं ही शुद्धता ओळखण्याची सोपी खूण मानली जाते.
सोन्याची शुद्धता आणि कॅरेट यांचं हे गणित लक्षात ठेवलं, तर खरेदीच्या वेळी फसवणूक टाळता येते.
Leave a Reply