वास्तुशास्त्रामध्ये दिवसाच्या सुरुवातीला विशेष महत्त्व दिले जाते. सकाळची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने व्हावी, यासाठी काही नियम पाळण्याचा सल्ला दिला जातो. घरातील सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी महिलांनी सकाळी उठल्यानंतर काही गोष्टी टाळाव्यात, असे वास्तुशास्त्र सांगते.
सकाळी उठल्यावर काय टाळावे
सकाळी झोपेतून उठल्या उठल्या अंथरूणात बसून हाताची किंवा पायाची बोटे मोडू नयेत. परंपरेनुसार सकाळच्या प्रसन्न वेळी बोटे मोडणे अशुभ मानले जाते. तसेच झोपेतून उठताना अपशब्द बोलू नयेत. सकाळची सुरुवात चांगल्या बोलण्याने व्हावी, असे मानले जाते.
स्नान आणि पूजेचे नियम
स्नान करण्यापूर्वी झाडूला हात लावू नये, असा सल्ला दिला जातो. सकाळच्या पूजेच्या वेळी व्यवस्थित बसावे. या छोट्या नियमांचे पालन केल्याने दिवसाची सुरुवात सकारात्मक होते, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.
Leave a Reply