तुळशीचं लग्न हे जवळपास प्रत्येक घरात साजरं होतं. दीपावली संपल्यानंतर कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमेदरम्यान तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. या काळात तुळशीला छान सजवण्यात येतं. नववधूप्रमाणे तुळशीला नटवून साजशृंगार चढवला जातो आणि तिचं लग्न शाळीग्राम व बाळकृष्णाशी लावण्यात येतं.
तुळशी विवाहाची परंपरा
हा विवाह अत्यंत सुंदर प्रकारे साजरा केला जातो. घरातील वातावरण यावेळी प्रसन्न असतं. तुळशीची विधिवत पूजा करून मंगलाष्टके म्हणून हा विवाह धार्मिकरित्या पार पाडण्यात येतो. त्यानंतर छान प्रसाद व नैवेद्य दाखवून हा विवाह संपन्न होतो. हिंदू धर्मात तुळशी विवाहाला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. कार्तिक एकादशीपासून तुळशी विवाहाची सुरुवात होते आणि तुळशीचा विवाह बाळकृष्ण किंवा शाळीग्रामाशी लावण्यात येतो.
शुभेच्छा संदेश आणि स्टेटस
या मंगलमय पवित्र दिनाच्या शुभेच्छा आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना देऊन तुळशी विवाह थाटामाटात साजरा करता येतो. सुंदर सजवलेलं तुळशी वृंदावन, दारातील रांगोळी आणि घरातील प्रसन्न वातावरण यामुळे तुळशीचं लग्न सर्वांच्या आनंदात आणि उत्साहात भर घालतं. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरून शुभेच्छा संदेश, स्टेटस आणि कोट्स पाठवून प्रियजनांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देता येतात. तुळशी व शाळीग्रामाच्या कृपेने आपल्या घरात सुख-समृद्धी नांदो, हीच या निमित्ताने प्रार्थना केली जाते.
Leave a Reply