तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय निर्यात-आयात बँक अर्थात एक्झिम बँकेने मॅनेजमेंट ट्रेनी आणि मॅनेजर पदांच्या एकूण १२० जागांसाठी भरती जाहीर केली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे.
## कोणत्या पदांसाठी किती जागा?
या भरतीत मॅनेजमेंट ट्रेनीच्या ९० जागा आणि मॅनेजरच्या ३० जागांचा समावेश आहे. एकूण १२० जागांसाठी ही भरती होणार आहे.
## पॅकेज किती?
निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक ३० लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांनी भरतीची सविस्तर माहिती आणि अर्जाची प्रक्रिया याबाबत अधिकृत माहिती तपासून अर्ज करावा.
Leave a Reply