अनेकदा पोट भरलेले असतानाही काहीतरी खाण्याची इच्छा होते. कधी गोड पदार्थ खावासा वाटतो, तर कधी चिप्स, फरसाण किंवा कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. काही जणांना तर चॉकलेट खाण्याची इतकी तीव्र इच्छा होते की, ते खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही. ही केवळ खाण्याची आवड नसून त्यामागे शारीरिक आणि मानसिक कारणेही असू शकतात.
क्रेव्हिंगमागची कारणे कोणती?
आहारतज्ज्ञांच्या मते, विशिष्ट पदार्थ खाण्याची वारंवार इच्छा होण्यामागे तणाव, झोपेची कमतरता, रक्तातील साखरेतील चढ-उतार, हार्मोन्समधील बदल किंवा शरीरातील पाण्याची कमतरता अशी अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे सतत होणाऱ्या फूड क्रेव्हिंगकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यामागचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे.
सततच्या इच्छेकडे दुर्लक्ष नका करू
वारंवार होणारी खाण्याची इच्छा ही शरीरातील एखाद्या बदलाचे लक्षण असू शकते. त्यामुळे ही इच्छा का होते, हे समजून घेणे गरजेचे आहे. क्रेव्हिंगचे कारण ओळखून त्यावर लक्ष देणे हाच योग्य मार्ग ठरतो. मात्र इच्छा सातत्याने जाणवत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
Leave a Reply