शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

ऊस दरावरून आंदोलन पेटले; बार्शीतील साखर कारखाना बंद

सोलापूर जिल्ह्यात ऊस दरावरून आंदोलन तापले आहे. बार्शीतील वृंदावन साखर कारखाना शेतकऱ्यांनी बंद पाडला असून तोडगा निघेपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

ऊस दरावरून आंदोलन पेटले; बार्शीतील साखर कारखाना बंद

सोलापूर जिल्ह्यात ऊस दराच्या प्रश्नावरून आंदोलन पुन्हा एकदा तापले आहे. ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला असतानाच दरवाढीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली असून बार्शी येथील वृंदावन साखर कारखाना शेतकऱ्यांनी बंद पाडला आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उसाच्या गव्हाणीत उड्या मारून कारखान्याचे काम थांबवले. सोलापूर जिल्ह्यातील ऊस दरावर अद्याप तोडगा निघालेला नाही, तरीही कारखानदारांनी कारखाने सुरू ठेवले आहेत. याचाच राग शेतकऱ्यांमध्ये आहे आणि त्यातूनच ही आक्रमक कृती करण्यात आली.

बैठकीतील निर्णयानंतरही कारखाने सुरूच

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जोपर्यंत ऊस दरावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत कारखाने बंद ठेवायचे असे ठरले होते. मात्र तरीही जिल्ह्यातील साखर कारखाने सुरूच राहिले. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट कारखाना बंद पाडण्याचे पाऊल उचलले. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.

शेतकऱ्यांनी केवळ कारखानाच बंद पाडला नाही, तर तेथील ट्रॅक्टरच्या चाकांमधील हवाही सोडून देण्यात आली. जोपर्यंत ऊस दरावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील कारखाने चालू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. दराच्या प्रश्नावर तोडगा निघत नसल्याने संघटनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance