डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि सूज येणे ही आजकाल सामान्य समस्या बनली आहे. ताणतणाव, जास्त वेळ स्क्रीन पाहणे, शरीरातील पाण्याची कमतरता आणि अपुरी झोप यामुळे ही समस्या उद्भवते. यावर उपाय म्हणून जीवनशैलीत बदल करण्यासोबत काही नैसर्गिक उपायही करता येतात.
काळी वर्तुळे का पडतात?
डोळ्यांभोवतीची त्वचा नाजूक असते. झोप अपुरी राहिली, पाणी कमी प्यायले गेले किंवा स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवला गेला, तर डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात आणि सूजही येऊ शकते. अॅलर्जी आणि डोळे वारंवार चोळणे यामुळेही डोळ्यांची सूज अधिक वाढू शकते.
घरगुती उपाय
काकडीच्या थंड चकत्या: डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी काकडीच्या थंड चकत्या डोळ्यांवर ठेवा. काकडीच्या थंड प्रभावामुळे डोळ्यांजवळची त्वचा शांत होते आणि जळजळ कमी होते.
दिवसभर पुरेसे पाणी प्या: दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते आणि रक्ताभिसरणाची पातळी सुधारण्यास मदत होते.
डोळे चोळणे टाळा: घराबाहेर असताना सनग्लासेस वापरा आणि डोळे चोळणे टाळा. यामुळे डोळ्यांच्या सभोवतालच्या त्वचेला इजा होणार नाही.
पुरेशी झोप घ्या: डोळे थकण्याचे मुख्य कारण म्हणजे अपुरी झोप. शरीराला आणि डोळ्यांना विश्रांती मिळण्यासाठी दररोज ७ ते ९ तास झोपणे आवश्यक असते. पुरेशी झोप घेतल्याने सकाळी डोळ्यांना सूज येत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
Leave a Reply