राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार महेश बालदी यांना तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी हा निर्णय दिला आहे. बालदी यांच्यासह एकूण चार जणांना न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
२०१० मधील प्रकरणात निर्णय
हे प्रकरण २०१० मधील असल्याची माहिती समोर आली आहे. प्रदीर्घ काळ चाललेल्या या खटल्यात न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची अधिक माहिती समोर येत असून बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply