राज्यातील हवामानात बदल होत आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. अकवन चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार असून काही भागांत धो धो पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्रापासून ८११ किलोमीटर अंतरावर धडकणार आहे. विदर्भासह राज्यातील काही भागांत यादरम्यान पाऊस होईल.
विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
२० ते २१ नोव्हेंबर या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील. विदर्भात पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे.
१३० किमी वेगाने धडकणार चक्रीवादळ
अकवन चक्रीवादळ अत्यंत धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात हे चक्रीवादळ धडकणार असून त्याचा वेग ताशी १३० किलोमीटर असेल. आंध्र प्रदेश आणि ओडिशाला या चक्रीवादळाचा खरा धोका असून तेथील प्रशासन अलर्ट मोडवर आहे. काही भागांत शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमध्येही या चक्रीवादळामुळे थंडी गायब झाली आहे. राज्यात दुष्काळाचे मोठे संकट असताना या पावसामुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांत राज्यात थंडी वाढली होती; चक्रीवादळामुळे आता थंडी गायब झाली आहे.
Leave a Reply