गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जाईच्या वेलीभोवती साप का येतात? कारण जाणून घ्या

घराजवळची जाईची वेल सापांना आकर्षित करू शकते. फुलांभोवती येणाऱ्या मधमाशा, किटक आणि बेडकांमुळे सापांना आयती शिकार मिळते, त्यामुळे स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.

जाईच्या वेलीभोवती साप का येतात? कारण जाणून घ्या

भारतात सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात. प्रत्येक प्रजातीची वैशिष्ट्ये आणि सवयी वेगवेगळ्या असतात. काही साप प्रचंड आक्रमक असतात, तर काही साप स्वभावाने खूप शांत असतात. मात्र या सर्वांमध्ये एक समान गोष्ट असते, ती म्हणजे काही विशिष्ट वनस्पती किंवा गोष्टींमुळे साप घराकडे आकर्षित होऊ शकतात. अशीच एक वनस्पती म्हणजे जाईचा वेल.

महाराष्ट्रातील विषारी सापांच्या प्रजाती

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश किंवा नेपाळला लागून असलेल्या भारताच्या सीमावर्ती प्रदेशात किंग कोब्रा ही सापाची अत्यंत विषारी जात आढळून येते. हे साप अतिशय विषारी आणि प्रचंड मोठे असतात, तसेच ते प्रचंड आक्रमक देखील असतात. त्यांना पाहताच भीती वाटते. महाराष्ट्रात सापाची ही प्रजात आढळून येत नाही. महाराष्ट्रात नाग आढळून येतात. नाग दिसायला किंग कोबरासारखेच असतात. परंतु किंग कोबराच्या तुलनेत ते आकाराने खूप छोटे असतात. मात्र नाग हे देखील अतिशय विषारी आणि आक्रमक असतात.

महाराष्ट्रात चार विषारी सापांच्या प्रजाती आढळून येतात, ज्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस आणि नाग यांचा समावेश होतो. यालाच बिग फोर असेही म्हटले जाते. प्रत्येक सापाचा त्याच्या प्रजातीनुसार स्वभावही वेगवेगळा असतो. घोणस आणि नाग या जातीचे साप अतिशय विषारी असतात, त्याचसोबत ते प्रचंड चपळ आणि आक्रमक देखील असतात. ते केव्हाही हल्ला करू शकतात. याउलट काही लाजाळू सापांच्या जाती देखील आढळून येतात. हे साप माणसांवर कधीही हल्ला करत नाहीत. ते माणसांपासून दूर निघून जातात.

जाईच्या वेलीभोवती साप का येतात?

अशा काही विशिष्ट वनस्पती असतात, ज्या त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे सापांना आपल्याकडे आकर्षित करतात. अशीच एक वनस्पती म्हणजे जाईचा वेल. या फुलांभोवती मोठ्या प्रमाणात मधमाशा आकर्षित होतात. त्यांना खाण्यासाठी विविध किटक देखील तिथे येतात. या किटकांना खाण्यासाठी बेडूक येतात आणि या झाडाभोवती बेडूक असल्यामुळे आयती शिकार मिळाल्याने अनेकदा साप देखील अशा वेलाभोवती असतात.

त्यामुळे अशा ठिकाणी जाताना नेहमी काळजी घ्यावी. या वेलाभोवती स्वच्छता ठेवावी. जास्त गवत वाढू देऊ नये. गवत वाढल्यामुळे या ठिकाणी उंदीर आणि घुशी यांची संख्या देखील वाढते, त्यामुळे सुद्धा साप देखील या ठिकाणी येतात.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance