अनेकांना बाईकची प्रचंड आवड असते. सोबतीला बाईक असेल, तर कुठेही फिरता येते आणि छोट्या सामानाची ने-आणही सहज करता येते. जावयाला भेट म्हणून बाईक द्यायची असेल आणि बजेट कमी असेल, तर सध्या काही उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. त्यांची किंमत कमी असून मायलेजही चांगले आहे.
चार परवडणाऱ्या बाईक
स्प्लेंडर प्लस : ही दुचाकी मजबूत असून कित्येक वर्षे तिच्यावर फारशी दुरुस्ती करावी लागत नाही. कमी किंमत आणि चांगले मायलेज देणाऱ्या दुचाकींमध्ये ती पहिल्या क्रमांकावर आहे. या बाईकची किंमत साधारण ७५ हजार ते ८० हजार रुपये आहे.
टीव्हीएस रायडर १२५ : ही बाईक दिसायला खूपच आकर्षक आहे. या बाईकची किंमत ९५ हजार रुपये आहे. या दुचाकीला डिजिटल स्क्रीन आणि एलईडी लाइट्स आहेत.
बजाज पल्सर १२५ : स्टायलिश बाईक म्हणून या दुचाकीची ओळख आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत ८५ ते ९५ हजार रुपये आहे आणि तिचे डिझाइन स्पोर्टी आहे.
होंडा शाईन १२५ : हीदेखील प्रसिद्ध आणि खिशाला परवडणारी बाईक आहे. या बाईकची किंमत ८० ते ८५ हजार रुपये आहे. ती सुरू केल्यानंतर तिचा आवाजही खूप कमी होतो. चांगले सरासरी मायलेज देणारी बाईक म्हणून या दुचाकीची ओळख आहे.
निवड करताना काय पाहावे?
भेट म्हणून बाईक निवडताना किंमत, मायलेज, देखभाल खर्च आणि दैनंदिन वापरातील सोय या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. वरील चारही बाईक ७५ हजार ते ९५ हजार रुपयांच्या दरात येतात आणि रोजच्या वापरासाठी त्या योग्य मानल्या जातात.
Leave a Reply