गोवा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील दारूची दुकाने आणि शॉपिंग मॉल आता २४ तास सुरू राहणार आहेत. हा नवा नियम तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. त्यामुळे गोव्यात गेलेला पर्यटक मध्यरात्रीही खरेदी करू शकेल आणि दारूची दुकानेही उघडी राहतील.
कोणाला मिळणार ही सूट
मॉलसोबतच दारूच्या दुकानांनाही २४ तास सुरू राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासोबत काही नियम आणि अटीही घालण्यात आल्या आहेत. विमानतळ परिसरातील दारूच्या रिटेल विक्रेत्यांना २४ तास दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. दारू विक्रीचा अधिकृत परवाना असलेल्या मोठ्या हॉटेल्सनाही २४ तास दारू विक्रीची परवानगी मिळाली आहे. तसेच पर्यटनस्थळांवरील दारूची दुकानेही २४ तास सुरू राहू शकतील. मात्र याव्यतिरिक्त सामान्य रिटेल विक्रेत्यांना २४ तास दुकाने सुरू ठेवता येणार नाहीत.
निर्णयामागचे कारण
गोवा हे देशातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र आहे. दरवर्षी लाखो लोक गोव्याला भेट देतात. यामध्ये दारू पिणाऱ्यांची संख्याही मोठी असते. पर्यटनाचा हंगाम नसतानाही गोव्यात पर्यटकांची गर्दी असते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
Leave a Reply