गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

गजेंद्र मोक्ष वहन मिरवणुकीने जळगावात भक्तीचा उत्साह

रथोत्सवात गजेंद्र मोक्ष वहनाची मिरवणूक उत्साहात निघाली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली, तर पानसुपारीच्या ठिकाणी अभंग-भारुडाने भक्तीचे वातावरण निर्माण झाले.

गजेंद्र मोक्ष वहन मिरवणुकीने जळगावात भक्तीचा उत्साह

जळगाव येथे श्रीराम वहनोत्सवात आज श्री गजेंद्र मोक्ष वहन उत्साहाच्या वातावरणात काढण्यात आले. वहनाच्या दर्शनासाठी महिला, बाल गोपालांसह वृद्धांसह तरुण वर्गाची मोठी गर्दी झाली होती. पानसुपारीच्या ठिकाणी अभंग व भारुड कार्यक्रमाने वहनाला भक्तीचे स्वरूप आले होते.

अभंग-भारुडाने भक्तीचे वातावरण

श्रीराम मंदिर संस्थानतर्फे रथ उत्सवामध्ये गुरुवारी श्री गजेंद्र मोक्ष वहनाची मिरवणूक काढण्यात आली. वहनाची पूजा हभप श्रीराम महाराज जोशी यांच्या हस्ते सायंकाळी सातला करण्यात आली. गजेंद्र मोक्ष वहनाच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. वहन मार्गावर फुले व रांगोळी टाकून स्वागत करण्यात आले. वहन श्रीराम मंदिर, भोईटे गढी, चौधरी वाडा, आण्णा भाऊ साठे चौक मार्गाने जाऊन अयोध्‍यानगरातील विनयकुमार बाहेती यांच्या घरी पानसुपारीचा कार्यक्रम झाला. येथे भजन, भारुडाच्या कार्यक्रमाने चांगलीच रंगत आणली होती. भाविकांचे पाय भजन व भारुडावर थिरकत होते. पानसुपारीचा कार्यक्रम होऊन त्याच मार्गाने वहन श्रीराम मंदिरात रात्री आले.

उद्या गरुड राजचे वहन

श्रीराम रथोत्सवात सुरू असलेल्या वहनोत्सवात दहावे वहन उद्या श्री गरुड राज यांचे काढण्यात येणार आहे. सायंकाळी सातला वहनाची पूजा व आरती होऊन वहन मिरवणुकीला सुरुवात होईल. यानंतर वहनाला विठ्ठल पेठ व शनिपेठ येथे पानसुपारी होईल.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance