गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

द्वारका चौकातील व्यावसायिकांची २६ नोव्हेंबरला सुनावणी

द्वारका परिसरातील महापालिकेच्या जागेवरील व्यावसायिक वापराच्या प्रकरणी २६ नोव्हेंबरला सुनावणी होईल. आक्षेप घेतलेल्या ४९ व्यावसायिकांना पत्रे देण्यात आली.

द्वारका चौकातील व्यावसायिकांची २६ नोव्हेंबरला सुनावणी

नाशिक पूर्व विभागातील जुना देवळाली नाका, म्हणजेच द्वारका परिसरातील अंतिम भूखंड क्रमांक २८२ या महापालिकेच्या जागेवर व्यावसायिक वापर सुरू असल्याचे प्रकरण आता सुनावणीच्या टप्प्यावर आले आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने सुनावणी आयोजित केली आहे. गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता राजीव गांधी भवन येथील उपायुक्त (अतिक्रमण) यांच्या कार्यालयात ही सुनावणी होणार आहे.

महापालिकेच्या नाशिक पूर्व विभागीय कार्यालयामार्फत ३ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भात व्यावसायिकांना नोटीस बजावली होती. संबंधित प्रकरणात जमिनीवरील ताबा, मालकी हक्क तसेच महापालिकेच्या जमिनीच्या हिताशी संबंधित बाबींची पडताळणी केली जाणार आहे. संबंधित व्यक्ती आणि त्यांचे वकील यांनी प्रकरणाशी निगडित आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सुनावणीवेळी सादर करावेत, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. सुनावणीस उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

७९ व्यावसायिक, ४९ जणांचे आक्षेप

येथील संपूर्ण भूखंडावर सुमारे ७९ व्यावसायिक आपले व्यवसाय थाटून व्यवसाय करत आहेत. पालिकेने नोटीस बजावल्यानंतर यातील ४९ व्यावसायिकांनी याबाबत आक्षेप घेतला आहे. आक्षेप घेतलेल्या व्यावसायिकांना सुनावणीच्या दिवशी प्रत्यक्षात उपस्थित राहून त्यांचे म्हणणे मांडायचे आहे. त्यानिमित्ताने महापालिका पूर्व विभागाच्या विविध कर विभागाच्या माध्यमातून येथील आक्षेप घेतलेल्या ४९ व्यावसायिकांना सुनावणी पत्रवाटप करण्यात आले आहे. पूर्व विभागीय कार्यालयामार्फत येथील व्यावसायिकांना सप्टेंबर महिन्यात देण्यात आलेल्या नोटिशीनंतर आता सुनावणीस हजर राहण्यासाठी पुन्हा सुनावणी पत्रवाटप करण्यात आले आहे.

डीपी प्लॅनची कागदपत्रे सादर होणार

सुनावणीदरम्यान महापालिकेकडून येथील डीपी प्लॅनबाबतची कागदपत्रे सर्वांसमोर सादर करण्यात येणार आहेत. आता सुनावणीत काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance