स्वयंपाकघरात विविध मसाल्यांमध्ये आल्याचाही वापर केला जातो. केवळ चहामध्येच नाही, तर अनेक पदार्थांमध्ये आल्याची पेस्ट वापरली जाते. चहा, भाज्या आणि अनेक चमचमीत पदार्थांमध्ये आले वापरले जाते. आले केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. गरमा गरम आल्याचा चहा किंवा काढा प्यायल्यास डोकेदुखी आणि मळमळ यांसारख्या समस्या दूर होतात.
आले सोलणे का कठीण असते?
अनेक पदार्थांमध्ये आले वापरले जात असले तरी ते सोलण्याचे काम अत्यंत कठीण असते. आल्याचा खडबडीत आकार आणि पातळ साल यामुळे ते सोलणे त्रासदायक वाटते. घाईगडबडीत जेवण बनवताना अनेकजण आले सोलण्यासाठी सुरीचा वापर करतात.
चमच्याची ट्रिक कशी वापरायची?
सुरीऐवजी चमचा वापरल्यास आले सोलणे अगदी सोपे होते. चमच्याच्या काठाने आल्यावर हलकेच घासल्यास त्याची पातळ साल सहज निघते. या ट्रिकमुळे आले वाया जात नाही आणि कामही लवकर होते. त्यामुळे पुढच्या वेळी आले सोलताना सुरीऐवजी चमचा वापरून पाहा.
Leave a Reply