पावसाळा संपला तरी घराच्या छतावर, गच्चीवर, अंगणात आणि भिंतींवर शेवाळ साचलेले दिसते. सततचा पाऊस, ओलावा आणि पाणी साचून राहिल्यामुळे या ठिकाणी हिरव्या रंगाचा थर तयार होतो. सुरुवातीला हे शेवाळ फारसे लक्षात येत नाही. मात्र हळूहळू त्याचे प्रमाण वाढते आणि घराच्या स्वच्छतेसोबतच सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो.
शेवाळ का साचते?
पावसाळ्यात सतत पडणारा पाऊस आणि हवेतील ओलावा यामुळे छत, गच्ची आणि भिंती ओल्या राहतात. पाणी साचून राहिलेल्या जागी शेवाळ लवकर वाढते. सावली असलेल्या आणि सूर्यप्रकाश कमी पोहोचणाऱ्या ठिकाणीही शेवाळाचे प्रमाण जास्त दिसते.
घसरण्याचा धोका आणि घरगुती उपाय
शेवाळ साचलेल्या जमिनीवरून चालताना पाय घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच दुखापत होण्याचा धोका असतो. अनेकजण शेवाळ काढण्यासाठी बाजारातून महागडे क्लीनर आणतात. पण तरीही काही दिवसांनी शेवाळ पुन्हा जमा होते. अशावेळी घरातल्या सोप्या गोष्टींचा वापर करून शेवाळ काढता येते. पाणी साचू न देणे आणि वेळोवेळी साफसफाई करणे हाच शेवाळापासून सुटकेचा सोपा मार्ग आहे.
Leave a Reply