नोकरी बदलताना नवीन कंपनी, चांगला पगार आणि करिअरची संधी याकडे अनेकांचे लक्ष असते. मात्र जुन्या कंपनीत जमा झालेल्या पीएफ आणि पेन्शनचे काय होणार, हा प्रश्न अनेकांना पडतो. जुना पीएफ काढता येतो का, नवीन कंपनीत परत खाते सुरू होते का आणि पेन्शनसाठी आधीची नोकरी मोजली जाते का, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. योग्य वेळी पीएफ ट्रान्सफर केल्यावर बचत आणि पेन्शनची सेवा दोन्ही सुरक्षित राहू शकतात.
UAN संपूर्ण कारकिर्दीत एकच
नोकरी बदलल्यानंतर नवीन यूएएन काढण्याची गरज नसते. तुमचा यूएएन अर्थात युनिव्हर्सल अकाउंट नंबर संपूर्ण नोकरीच्या काळात एकच राहतो. नवीन कंपनीला जुनाच यूएएन द्यायचा असतो. त्यामुळे नोकरी बदलली तरी तुमचे पीएफ खाते आणि त्याशी जोडलेली माहिती एकाच यूएएनशी जोडलेली राहते.
वेळीच ट्रान्सफर का महत्त्वाचे
जुना पीएफ नवीन खात्यात वेळीच ट्रान्सफर केल्यास तुमची आतापर्यंतची बचत एकाच ठिकाणी जमा राहते आणि पेन्शनची सेवा सुरक्षित राहण्यास मदत होते. त्यामुळे नोकरी बदलल्यानंतर पीएफ ट्रान्सफरची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे फायदेशीर ठरते.
Leave a Reply