आयआयएममधून एमबीएची पदवी मिळवून कॉर्पोरेट क्षेत्रात ५० लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज मिळवणाऱ्या अक्षिता जैन यांनी आता वेगळा मार्ग निवडला आहे. त्या जैन साध्वी होण्याचा निर्णय घेतला आहे.
अध्यात्माकडे वळण
कॉर्पोरेट जीवनात असतानाच अध्यात्माकडे असलेली ओढ आणि अहिंसेच्या विचारांनी त्यांना प्रभावित केलं. या विचारांमधूनच त्यांनी संन्यास स्वीकारण्याचा निर्णय घेतला, असं सांगितलं जातं.
आईचाही हाच मार्ग
अक्षिता यांच्या आई शिरोमणी बजाज यांनीही यापूर्वीच इंडियन ऑईलमधील नोकरी सोडून साध्वी दीक्षा घेतली होती. आईच्या मार्गावरूनच अक्षिता यांनीही हाच निर्णय घेतल्याचं समजतं.
उच्च शिक्षण आणि चांगल्या पगाराची नोकरी सोडून साध्वी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे या प्रकरणाची सध्या चर्चा होत आहे.
Leave a Reply