प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला चाहत्यांनी तुफान गर्दी केली. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ढोक सांगवी येथे हा कार्यक्रम झाला. कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते जमले होते.
झाडावर चढून नृत्याचा आनंद
कार्यक्रमाच्या ठिकाणी जागा मिळेना म्हणून काही चाहत्यांनी थेट झाडावर चढून गौतमी पाटील यांच्या नृत्याचा आनंद घेतला. चाहत्यांचा हा अनोखा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
व्हिडिओ व्हायरल
या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. झाडावर चढून नृत्य पाहणाऱ्या चाहत्यांचे दृश्य पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
Leave a Reply