‘ये है मोहब्बतें’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती नव्या नवरीच्या रूपात दिसत आहे. तिने स्वतः ‘दुसऱ्यांदा लग्न केलं आहे’ असे म्हटल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र या फोटोंमागचे खरे कारण वेगळेच आहे.
खरं कारण काय?
दिव्यांका लवकरच ‘पती पत्नी और पंगा 2’ या शोच्या येत्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये वेडिंग थीम ठेवण्यात आली असून, सर्व सेलिब्रिटी जोडप्यांनी त्यांचा वेडिंग लूक पुन्हा साकारला आहे. टीव्ही विश्वातील प्रसिद्ध जोडपे दिव्यांका आणि विवेक दहिया यांनीही त्यांचा वेडिंग लूक पुन्हा साकारला. दोघांना नवरा-नवरीच्या रूपात पाहून चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचला.
नव्या नवरा-नवरीच्या रूपात दिव्यांका आणि विवेक यांनी पापाराझींसाठी पोजही दिल्या. यावेळी अभिनेत्री म्हणाली, ’10 वर्षांत आमचं दुसरं लग्न होतं आहे.’ तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
दिव्यांका-विवेक यांचा प्रवास
दिव्यांका आणि विवेक यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, दोघांनी 16 जानेवारी 2016 रोजी साखरपुडा केला. त्यानंतर 8 जुलै 2016 रोजी भोपाळ येथे त्यांनी लग्न केले. 26 जुलै 2026 रोजी त्यांनी जुळ्या मुलांचे जगात स्वागत केले.
जुळ्या मुलांबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांनी शोमध्ये मुलांची एक झलक दाखवली. त्यांच्या गोंडस मुलांना पाहिल्यानंतर सर्वांना प्रचंड आनंद झाला. दिव्यांका कायम मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
Leave a Reply