‘मालगुडी डेज’ ही मालिका अनेकांच्या मनात आजही ताजी आहे. या मालिकेत स्वामीची भूमिका साकारणारा बालकलाकार मास्टर मंजुनाथ त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्याच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आज मात्र तो अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.
शिक्षणानंतर वेगळी वाट
शिक्षण पूर्ण केल्यानंतर मंजुनाथने अभिनयापेक्षा वेगळा मार्ग निवडला. तो सध्या पॉलिसी अॅडव्हायझर म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर कॉर्पोरेट क्षेत्रात सल्लागाराची भूमिकाही तो पार पाडतो. एकेकाळी कॅमेऱ्यासमोर दिसणारा हा कलाकार आता व्यावसायिक जगतात आपली ओळख निर्माण करत आहे.
बालकलाकार म्हणून मिळालेली लोकप्रियता आणि त्यानंतरचे आयुष्य यातील फरक अनेकांना उत्सुकता निर्माण करतो. मंजुनाथने मात्र आपल्या शिक्षणाच्या जोरावर नवे करिअर घडवले आहे.
Leave a Reply